
रेल्वे रुळाला तडा गेल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. चर्चगेट ते बोरिवली आणि विरार मार्गावरील लोकसेवा कोलमडलीय. मालाड ते कांदिवली दरम्यान रुळाला तडे गेल्याची माहिती समोर आलीय. सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.