याला म्हणतात माणुसकी, म्हणून पोलिसांनी ही केला 'या' दाम्पत्याला सलाम

याला म्हणतात माणुसकी, म्हणून पोलिसांनी ही केला 'या' दाम्पत्याला सलाम

मुंबईः  कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबईत या व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव झाला आहे. शहरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. अशातच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अहोरात्र मेहनत घेताना दिसत आहेत. पोलिस, डॉक्टर, नर्स, पालिका कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून कोरोनाचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न करताहेत. गेल्या तीन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी पोलिस रस्त्यांवर उतरुन आपली सेवा बजावत आहेत. 

लॉकडाऊन नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी या हेतूने शहरातील पोलिस विभाग दिवसरात्र काम करत आहेत. आपली सेवा बजावत असताना त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून चेंबूरमधल्या एका दाम्पत्यानं त्यांची काळजी घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून रोझमंड डिसूझा (48) आणि स्वीटी डिसूझा (45) या जोडप्यानं शहरातील नाकाबंदी चौकीवर ड्युटीवर काम करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना दररोज चहा आणि नाश्ताचे वाटप करतआहेत. या दाम्पत्यानं जवळपास १०० पोलिसांना दररोजचा नाश्ता आणि चहा दिली आहे. 

रोझमंड एक सिव्हील कंत्राटदार असून स्वीटी हा गृहिणी आहेत. हे दोघंही दररोज दुपारी ३  ते संध्याकाळी ७ या वेळेत आपल्या गाडीतून मानखुर्द, चेंबूर आणि वडाळासह विविध नाकाबंदी चौकांवर स्नॅक्स पॅक करून घेऊन जातात. 

या दाम्पत्यानं सांगितले की, लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून पोलिस आपलं कर्तव्ये  एकदम चोख निभावत आहेत. ते अहोरात्र मेहनत घेत आहेत. हे  पाहता आम्ही त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला.  सुरुवातीला आम्ही कोल्ड ड्रिंक्स वाटप करण्याचा विचार केला. मात्र नंतर  लक्षात आले की सध्याच्या परिस्थितीत ते योग्य ठरणार नाही. म्हणून आम्ही घरी काही आयुर्वेदिक चहा आणि स्नॅक्स बनवण्याचा निर्णय घेतला.

पुढे त्यांनी सांगितलं की, सुरुवातीला  चेंबूर भागात चहा आणि पराठे देत होतो. त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या नाकाबंदी असलेल्या चौक्यांवर पोलिसांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली. 

रोझमंड म्हणाले,  दुपारी 1 च्या सुमारास माझी बायको आणि मी चहा आणि पराठे बनवण्यास सुरुवात करतो. दुपारी 3 वाजेपर्यंत आम्ही सर्व काही संपवून ते स्नॅक्स पॅक करतो. त्यानंतर हे सर्व खाद्यपदार्थ दररोज सुमारे आठ ते 10 चेकपॉईंट्सवर घेऊन जातो. मुख्यत: जेथे कोविड- 19 प्रकरणे अधिक आहेत तिथे हे घेऊन जात असतो. 

ते म्हणाले, तुम्ही इतरांसाठी पुढाकार घेतल्यानं त्यापासून वेगळ्या प्रकारचे समाधान मिळतं. योग्य वेळी योग्य ती मदत देणं खूप महत्वाचे आहे. दाम्पत्यानं केलेली ही मदत पाहून पोलिसांनीही त्यांचं कौतुक केले आहे. तसंच आणि गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांसोबत त्यांचं एक भावनिक नातंही तयार झालं आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी कौतुक म्हणून त्यांना आंब्याची पेटीही दिली. इतकंच काय तर चक्रीवादळादरम्यानही या दाम्पत्यानं त्यांची सेवा थांबवली नाही. ती नेहमीप्रमाणे सुरू ठेवली. 

स्वीटी पुढे म्हणाल्या की, सुरुवातीला जेव्हा आम्ही पोलिसांना स्नॅक्स द्यायचो तेव्हा अन्न कुठून आलं हे त्यांना ठाऊक नसायचं.  पण जेव्हा मी त्यांना सांगितले की हे सर्व घरगुती आहे, तेव्हा ते स्वेच्छेने घेत असतं. 

कॉन्स्टेबल धर्मेंद्र सिंह म्हणाले की, पोलिस रात्रंदिवस काम करत असताना, डिसोझा दाम्पत्य आम्हाला चहा आणि नाश्ता देत आहेत याबद्दल आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत. आणखी एक कॉन्स्टेबल व्ही तावडे म्हणाले, जेव्हा संपूर्ण लॉकडाऊन होते तेव्हा आम्हाला कुठेही चहा सापडत नव्हता. डिसोझा दाम्पत्य भर उन्हात चहा आणि नाश्त्याचे वाटप करत होते. 

Mumbai Lockdown police force Chembur Couple give Homemade Snacks

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com