Lok Sabha Election Result : मुंबईत 'नोटा'ची ताकद! महायुती, महाविकास आघाडीचे उमेदवार वगळता इतर उमेदवार फिके

Mumbai Lok Sabha Election Result 2024 : प्रमुख पक्षांच्या उमेदवारांशिवाय मैदानात सक्षम उमेदवार नसल्याने मतदारांनी वरील पैकी कोणीही नाही म्हणजे नोटाचा पर्याय निवडत आपले बहुमोल मत दिले आहे.
Nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election esakal

मुंबई, ता. ४ : लोकसभा निवडणूकीत 'नोटा'ची ताकद मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार वगळता इतर एकाही पक्षाच्या ना अपक्षाला नोटापेक्षा जास्त मिळू शकलेली नाहीत. तब्बल ७२ हजार १९२ नोटाने मते घेतली आहेत. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांशिवाय मैदानात सक्षम उमेदवार नसल्याने मतदारांनी वरील पैकी कोणीही नाही म्हणजे नोटाचा पर्याय निवडत आपले बहुमोल मत दिले आहे.

निवडणूक रिंगणात मतदाराला सक्षम किंवा त्यांच्या पसंतीचा उमेदवार नसेल तर आपले मत कोणाला मत द्यायचे असा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने २०१४ पासून नोटाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार २०१४ आणि २०१९ मध्ये मतदारांनी नोटाला पसंती दिली होती. मात्र यंदा मुंबईच्या सहाही मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीने सक्षम उमेदवार दिले होते. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या निवडणूकीत नोटाला काहीसे कमी मतदान केले असले तरी एकूण झालेल्या मतदानाचा विचार करता मागील वर्षीच्या तुलनेत नोटाला जास्त मते मिळाली आहेत. २०१४ मध्ये नोटाला ५२ हजार ९५८, २०१९ मध्ये ८२ हजार २७५ मतदारांनी मुंबईत नोटाला मतदान केले होते.

सक्षम उमेदवार नसल्याचा परिणाम

महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वगळाता निवडणूक रिंगणात तिसरा कोणीही सक्षम उमेदवार नव्हता. त्यामुळेच प्रमुख पक्षाचे दोन उमेदवार वगळता तिसरा सक्षम उमेदवार निवडणूक रिंगणात नव्हता. त्यामुळे मतदारांनी आपले मत इतर कोणत्याही उमेदवाराला न देता नोटाला दिले आहे. त्याला दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील अबुल हसन खान आणि उत्तर पूर्व मतदारसंघातील दौलत खान हे दोन उमेदवार अपवाद असून त्यांना नोटापेक्षा जास्त मते मिळाली आहेत.

Nashik Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha Election Winners Full List : महाराष्ट्राने भाकरी फिरवली! मविआचा महायुतीवर मोठा विजय; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

- निवडणूक रिंगणात आपले मत द्यावा असा योग्य उमेदवार नसल्यानेच मतदारांनी मतदारांनी आपले अनमोल मत नोटाला देत निषेध नोंदवल्याचे दिसत आहेत.

- चेतन बरगडे

- राजकारणात स्वच्छ चारित्र्यांच्या लोकांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे सुशिक्षित मतदारांना मत देण्यासाठी पर्याय दिसत नाही. त्यामुळेच ते नोटाला मत देत असून त्याचाच प्रत्यय मुंबईत नोटाला मिळालेल्या मतांवरून दिसत आहे.

- विलास गारोडिया

- राज्याचे आणि देशाचे राजकारण दिवसोंदिवस गढूळ होत चालले आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात योग्य उमेदवार नसल्याने मतदार नोटाच्य माध्यमातून आपली नाराजी दर्शवत आहेत.

- प्रिया करंदीकर

Nashik Lok Sabha Election
Nashik Constituency Lok Sabha Election Result : नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे किंग! ठाकरे गटाने गोडसेंना दाखवलं अस्मान

नोटाला मिळालेली मते

मतदारसंघ - २०२४..... २०१९.... २०१४

उत्तर मुंबई - १२६४२.... ११९६६.... ८७५८

उत्तर पश्चिम मुंबई १३७८७.... १८२२५.... ११००५

उत्तर पूर्व मुंबई ९८३९.... १२४६६.... ७११४

उत्तर मध्य मुंबई ९२८१ .... १०६६९.... ६९३७

दक्षिण मध्य मुंबई १३४२३.... १३८३४.... ९५७१

दक्षिम मुंबई १३२२१.... १५११५.... ९५७३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com