राजे रजवाड्याकडून कर्ज देण्याचे आमिष; करोडो रुपयांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

कथीत राजे महाराजाकडुन करोडो रुपयांचे लोन देण्याचे आमीष दाखवुन, मॅन्डेट फी, विमा फीच्या नावाने लाखो रुपये घेवुन कुठल्याही प्रकारचे लोन न देता आर्थिक फसवणुक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.

राजे रजवाड्याकडून कर्ज देण्याचे आमिष; करोडो रुपयांची फसवणूक

मुंबई - कथीत राजे महाराजाकडुन करोडो रुपयांचे लोन देण्याचे आमीष दाखवुन, मॅन्डेट फी, विमा फीच्या नावाने लाखो रुपये घेवुन कुठल्याही प्रकारचे लोन न देता आर्थिक फसवणुक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ११ च्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की, मुंबईत राजे राजवाड्यांकडून कर्ज मिळवून देण्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्या टोळी सक्रिय असल्याची गोपनीय माहीती प्राप्त झाली.

राजे राजवाड्यांकडून कर्ज

मुंबई शहरामध्ये काही ईसम हे ज्यांना बँका लोन देत नाही किंवा त्यांचे खाते एन पी ए झालेले आहे परंतु त्यांना मोठया रक्कमेच्या लोनची आवश्यकता आहे अशा व्यवसायीकांना एजंट मार्फत शोधुन फसवणूक करत आहेत. कर्जाची गरज असलेले परंतु कर्जासाठी पात्र नसलेले अशांना हेरून आरोपी राजस्थान मधील कथीत राजे महाराजे यांचेकडे करोडो रुपये असुन ते त्यांना कमी व्याजदरात लोन स्वरुपात दयायला तयार आहेत असे सांगत. त्यांना करोड़ो रुपयांचे बिझनेस लोन देण्याचे आमीष दाखवत असत. नंतर मॅन्डेड फी, लोन विमा व इंग्लीश मॉरगेज स्टॅम्प ड्युटीच्या नावाखाली त्यांचेकडुन करोडो रुपये घेतले जात. परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचे लोन मंजुर न करता त्यांची करोडो रुपयांची फसवणुक केली जात असे.

पोलिसांची कारवाई

वरील माहितीवरुन ज्या इसमांची अशाप्रकारचे फसवणुक झालेली आहे. अशा इसमांचा शोध घेण्यात आला व त्यामध्ये एका फसवणुक झालेल्या इसमाचा चौकशीकामी अर्ज प्राप्त करण्यात आला. सदर अर्जाच्या चौकशीवरुन फसवणुक करणाऱ्या इसमांविरुद्ध वर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 सप्टेंबर रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर व अंबरनाथ येथुन सदर टोळीतील दोन सुत्रधार यांना ताब्यात घेवुन चौकशीअंती अटक केली. सदर अटक आरोपी यांचेकडे केलेल्या तपासांमध्ये त्यांनी सदर गुन्हयातील पाहीजे आरोपी दिपक सौंदा हा कधी बँकेचा अधिकारी कधी राजस्थान मधील कथीत राजा महाराजा तर कधी मोठा शासकीय अधिकारी असे विविध वेश बदलून फसवणूक करत असे.

Web Title: Mumbai Lure Of Loans From Royal Palaces Fraud Worth Crores Of Rupees Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..