esakal | जनशताब्दी विशेष ट्रेन संदर्भात रेल्वेनं घेतला मोठा निर्णय, प्रवाशांना होणार फायदा
sakal

बोलून बातमी शोधा

जनशताब्दी विशेष ट्रेन संदर्भात रेल्वेनं घेतला मोठा निर्णय, प्रवाशांना होणार फायदा

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी मुंबई ते मडगाव जनशताब्दी विशेष ट्रेन आठवड्यातून पाच वेळा धावणार आहे.

जनशताब्दी विशेष ट्रेन संदर्भात रेल्वेनं घेतला मोठा निर्णय, प्रवाशांना होणार फायदा

sakal_logo
By
कुलदिप घायवट

मुंबई:  कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी मुंबई ते मडगाव जनशताब्दी विशेष ट्रेन आठवड्यातून पाच वेळा धावणार आहे. ही एक्सप्रेस पूर्णपणे आरक्षित असणार आहे. या एक्सप्रेसचे आरक्षण सामान्य भाडे दराने शनिवारी रोजीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरु होणार आहे. 

गाडी क्रमांक 01151 जनशताब्दी सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस 10 फेब्रुवारीपासून मंगळवार आणि शुक्रवार वगळता आठवड्यातून ५ दिवस पुढील सूचना मिळेपर्यंत दादर येथून पहाटे 5.25 वाजता सुटेल आणि मडगावला त्याचदिवशी दुपारी 2.10  वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01152 जनशताब्दी सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस 10 फेब्रुवारीपासून मंगळवार आणि शुक्रवार वगळता आठवड्यातून ५ दिवस पुढील सूचना मिळेपर्यंत मडगाव येथून दुपारी 2.40 वाजता सुटेल आणि दादरला त्याचदिवशी रात्री 11.15  वाजता पोहोचेल.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या एक्सप्रेसला ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम येथे थांबा देण्यात आले आहेत. या गाडीला एक व्हिस्टाडोम कोच, दोन एसी चेअर कार आणि 12 द्वितीय श्रेणी आसन असणार आहेत. या एक्सप्रेसमधून फक्त आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवासादरम्यान  कोरोना नियमांचे  पालन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा- प्रभादेवीमध्ये केंद्र सरकारविरोधात शिवसेनेचे गाजर आणि लॉलीपॉप आंदोलन

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai to Madgaon Janshatabdi special train will run five times a week

loading image