जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी केली मोर्चेकऱ्यांची रुग्णसेवा

दिनेश चिलप मराठे
मंगळवार, 13 मार्च 2018

मुंबई - अखिल भारतीय किसान संघाद्वारे आयोजित मोर्च्यात सामिल झालेल्या 650 मोर्चेकऱ्यांची जेजे रुग्णालयातील डॉक्टरानी रुग्णसेवा केली.

या संदर्भात डॉ. सुधीर ननंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 650 शेतकरी रुग्ण तपासले असुन, त्यापैकी 250 रुग्णांच्या जखमांवर उपचार करण्यात आले. डी हायड्रेशन झालेल्या180, अंग दुखीचे 350, सर्दी तापाचे 200 रुग्ण यांच्यावर देखील उपचार करण्यात आले.

या वेळी सर जेजे रुग्णालय समुहाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण राठोड, डॉ.रेवत कनिन्दे, डॉ.मोनाली चोपडे, डॉ.आकाश वाघमारे, डॉ.प्रितम नरोड, डॉ.सुमेध जाधव, डॉ.अमर आगमे, डॉ.अश्विनी कुलमेथे, डॉ.प्रिती चिंचोलकर, डॉ. शिवानी डोईफोड़े यांनी सेवा दिली. अधिक्षक डॉ.संजय सुरासे यांनी यशस्वी नेतृत्व केले.

Web Title: mumbai maharashtra j j hospital mumbai farmer long march doctors

टॅग्स