ठाण्यात शिवरायांचा जयघोष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

ठाणे - मराठी क्रांती मोर्चात ठाण्यातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सकाळपासूनच रेल्वेने आणि द्रुतगती महामार्गावरून ठाण्यातील मराठा समाजाचे आबालवृद्ध मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. त्यात तरुणाईचा सहभाग प्रचंड होता. रेल्वेस्थानक परिसर आणि आनंदनगर चेकनाका परिसरात सकाळपासून ‘जय भवानी जय शिवराय’चा जयघोष सुरू होता.

मुंबईतील मराठा समाजाच्या मोर्चात ठाण्यातील सर्व पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी आपापल्या ग्रुपमध्ये पंधरा दिवसांपासून मुंबईला जाण्याचे नियोजन केले होते. त्यातही प्रामुख्याने जास्तीत जास्त संख्येने रेल्वेने जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. द्रुतगती महामार्गावरून ठाण्याच्या बाहेरून येणाऱ्या मराठा समाजाच्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असेल, त्यात ठण्यातील वाहनांची भर पडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे रेल्वेतील गर्दी अधिक वाढली. 

विशेष म्हणजे रेल्वेस्थानक परिसरात येणाऱ्या मोर्चेकऱ्यांबरोबर अनेक सामान्य नागरिकही सेल्फी काढून आपला पाठिंबा दर्शवत होते.

Web Title: mumbai maharashtra news maratha kranti morcha