मुख्यमंत्र्यांनी पत्नीसह अभिनयात आजमावले हात - व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

मुंबई - नद्यांच्या संवर्धनासाठी शनिवारी रिव्हर मार्चच्या माध्यमातून नदीचे गाणे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले. अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी या गाण्याला आवाज दिला असून, 4 मार्चला नद्यांची प्रत्यक्ष परिस्थिती पाहायला नदी परिक्रमेसाठी दहिसर नदी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे. 

या गाण्यात अमृता फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही सहभाग घेतला आहे. याचबरोबर मुंबईचे डबेवाले, कोळीबांधवही या गाण्यात मुंबईच्या नद्यांना पुनरुज्जीवन देण्यासाठी सहभागी झाले आहेत.

Web Title: mumbai maharashtra river devendra fadnavis amruta fadnavis