मुंबईतील शाळेचा कौतुकास्पद निर्णय; हजार विद्यार्थ्यांची फी माफ

मुंबईतील शाळेचा कौतुकास्पद निर्णय; हजार विद्यार्थ्यांची फी माफ असा निर्णय घेणारी मुंबईतील पहिलीच शाळा Mumbai Malad Holy Star English School waived the fees of one thousand students
 school
schoolGoogle

असा निर्णय घेणारी मुंबईतील पहिलीच शाळा

मुंबई: कोरोना काळात असंख्य नागरिकांचा रोजगार आणि नोकऱ्याही अडचणीत आलेल्या असल्याने मुंबईतील मालवणी येथील होली स्टार या इंग्रजी शाळेने आपल्या शाळेत शिकत असलेल्या तब्बल एक हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करणारी मुंबईतील ही पहिली शाळा ठरली असून या विषयी पालक संघटनांकडून या शाळेच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले जात आहे. (Mumbai Malad Holy Star English School waived the fees of one thousand students)

 school
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज, काय आहे रणनीती?

शाळेचे मुख्याध्यापक हुसैन शेख म्हणाले की, आमच्या शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांचे सर्व पालक आर्थिक अडचणीत सापडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा मिळावा आणि विद्यार्थ्यांची शिक्षणही पूर्ण व्हावी म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. यामुळे आमच्या शाळेची आर्थिक बाजू खूप मोठ्या प्रमाणात कमकुवत होईल हे आम्हाला माहित आहे. मात्र एक सामाजिक भान म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शाळा चालवण्यासाठी गरज पडली तर आम्ही कुटुंबातील सोने, दागिने विकून सर्व मुलांना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या निर्णयासाठी शिक्षकांनी मोठा आधार दिला असून त्यांनाही आपले योगदान देण्याचे मान्य केल्याने आम्हाला हा निर्णय घेता आल्याचे त्यांनी सांगितले.

 school
राज्यात खासगी शाळांचा शुल्कवसुलीचा धंदा सुरू!

आमच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळेत 1हजार 500 विद्यार्थी शिकत आहेत, त्यातील ज्या पालकांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यातील अनेकांना आम्ही या शुल्कात अर्धी सवलत दिल्याने त्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. यासोबतच ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहेत अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून शाळेच्या आवारातच या विद्यार्थ्यांसाठी आम्ही मदतीसाठी एक मोठा बॉक्स ठेवला आहे अनेक दानशूर नागरिक या मदतीसाठी पुढे येत असल्याचेही हुसेन शेख यांनी सांगितले.

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com