रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या गुळवेलाचे आश्चर्यकारक फायदे

रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या गुळवेलाचे आश्चर्यकारक फायदे

मुंबई : सध्या जगभरात कोरोना नावाच्या व्हायरसनं जगात थैमान घातलं आहे. ज्या लोकांमध्ये पुरेशी रोगप्रतिकारक क्षमता नाही किंवा ज्यांना मधुमेह किंवा ब्लड प्रेशरसारखे आजार आहेत, अशा लोकांना कोरोनाची लागण होताना पाहायला मिळतेय. त्यामुळे कोरोनाबद्दल लोकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मात्र या सगळ्यातही घरघुती उपाय करून तुम्ही स्वतःचं आरोग्य उत्तम ठेऊ शकता. यासाठी तुम्हाला गुळवेलचं सेवन करणं महत्वाचं असणार आहे. गुळवेलच्या पानांमध्ये काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे हे तुमचा सर्दी पासून तर डायबीटीजपर्यंत सर्व आजारांपासून बचाव करतं. तसंच तुमची रोगप्रतिकारक क्षमताही यानं वाढते.  आज तुम्हाला याच गुळवेलचे काही फायदे सांगणार आहोत.

जाणून घ्या गुळवेलचे फायदे:

  • गुळवेलच्या पानांचा रस नियमित पिण्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते तसंच शरीर निरोगी राहतं.
  • गुळवेलमध्ये अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. सतत ताप येत असेल तर गुळवेलच्या पानांचं सेवन केल्यामुळे ताप निघून जातो.
  • गुळवेल मलेरिया, टायफाईड अशा रोगांवर उपचार करण्यासाठीहे वापरण्यात येतं.
  • गुळवेलच्या सेवनामुळे पोटाच्या समस्याही दूर होतात. गुळवेलच्या सेवनामुळे अपचन होत नाही आणि पोटदुखीही कमी होते.
  • मधुमेहासारखा असाध्य आजारही गुळवेलच्या सेवनामुळे कमी होऊ शकतो. गुळवेलमध्ये हायपोग्लायसेमिक  असतं, जे टाईप २ मधुमेहावर अत्यंत गुणकारी असतं.
  • गुळवेलमुळे दम, खोकला आणि कफापासूनही आराम मिळतो.
  • गुळवेलमुळे मानसिक तणाव कमी होतो.
  • लहान मुलांनी गुळवेलचं सेवन केल्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढते.

असा घरच्या घरी तयार करा गुळवेलचा ज्यूस:

  • किमान १ फूट लांब गुळवेलची फांदी घ्या आणि त्याचे लहान तुकडे करा.
  • यानंतर त्याच्यावरचं साल काढून घ्या.
  • मिक्सरमध्ये या तुकड्यंना बारीक करून घ्या.
  • त्यानंतर या मिश्रणाला गाळून घ्या अशा पद्धतीनं गुळवेलचा ज्यूस तयार होईल.
  • तुम्ही दिवसातून दोन वेळा या ज्यूसचं सेवन करू शकता आणि निरोगी राहू शकता.

increase your immunity by having giloy juice read how to make giloy juice

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com