वटवाघुळांमधून पसरलेला कोरोना विषाणू वटवाघूळांना का मारत नाही ? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

कुठल्याही व्हायरसला मानवी शरीरात जाण्यासाठी आधी होस्टची म्हणजेच माध्यमाची गरज असते. या होस्टच्या माध्यमातून हे व्हायरस मानवी शरीरात प्रवेश करतात

मुंबई : कोरोना व्हायरसचा संसर्ग हा वटवाघुळांमुळे पसरला अशी चर्चा आहे. चीनमध्ये लोक वातावघुळांचं मास खातात, सूप पितात. त्यामुळे कोरोना व्हायरस वटवाघुळांमधून माणसाच्या शरीरात आला असावा असं काही जाणकारांचं म्हणणं आहे. मात्र असं खरंच असेल तर कोरोना व्हायरसमुळे माणसांचा मृत्यू होतो,  तसा वटवाघुळांचा का होत नाही ? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.

कोरोना व्हायरस का राहतो वटवाघुळांच्या शरीरात:

कुठल्याही व्हायरसला मानवी शरीरात जाण्यासाठी आधी होस्टची म्हणजेच माध्यमाची गरज असते. या होस्टच्या माध्यमातून हे व्हायरस मानवी शरीरात प्रवेश करतात. कोरोना केसमध्ये वटवाघूळ हे होस्ट होते. वटवाघुळांचं आयुष्य १६ ते ४० वर्षांपर्यंत असतं. त्यामुळे इतर पक्ष्यांपेक्षा हे सस्तन पक्षी जास्त काळ जगणारे आहेत. अशात वटवाघुळांच्या शरीरात  हे विषाणू जास्त काळ राहतात. वटवाघूळ हे मोठ्या संख्येने राहतात, त्यामुळे कायम वटवाघुळांच्या माध्यमातून विषाणू पसरण्याचा धोका जास्त असतो. वटवाघुळांना चीनमध्ये अन्न म्हणून  येतं. अशात हे विषाणूं पक्षांमधून मानवी शरीरात आल्याचं बोललं जातंय.

मोठी बातमी - कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत कशी कराल घराची सफाई? या गोष्टींकडे लक्ष ठेवा

कोरोनामुळे का मरत नाहीत वटवाघूळ

कोरोना व्हायरस जेव्हा एखाद्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा त्या शरीरात इंफ्लेमेशन व्हायला सुरुवात होते. इंफ्लेमेशं म्हणजे आतून सूज यायला सुरुवात होते. मात्र वटवाघुळांमध्ये इंफ्लेमेशन क्षमता नसते. त्यामुळे कोरोनाचा वटवाघुळांवर काहीही परिणाम होत नाही. यासोबत वातावघुळांच्या शरीरात नॅचरल किलर सेल्सची मोठ्या प्रमाणावर कमतरता असते. त्यामुळे कोरोना विषाणू वटवाघुळांच्या पेशींमध्ये जिवंत राहतो. वटवाघुळांच्या शरीराचा मेटाबॉलिक रेट जास्त असतो. त्यामुळे त्यांच्या शरीरात या व्हायरसपासून सामना करण्यासाठी ऑक्सिजन स्पिशिज तयार होतात. अशात या व्हायरसवर मत देखील होते आणि म्हणूनच वटवाघुळांचा कोरोनामुळे मृत्यू होत नाही.

मोठी बातमी - हा फोटो इटली किंवा अमेरिकेतील नाही; हे आहे मुंबईतील NSCI डोम क्वारंटाईन सेंटर

वटवाघुळांच्या शरीरात राहून कोरोना व्हायरस अधिक घातक होतात. मानवी शरीरात कोरोना व्हायरस पसरल्यावर हा व्हायरस लगेच मानवी शरीराला पुन्हा एकदा होस्ट बनवतात. आणि यामुळेच कोरोनाचा मोठा संसर्ग पसरू शकतो. 

why corona virus do not show ill symptoms on bats read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why corona virus do not show ill symptoms on bats read full story