esakal | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईच्या महापौर (Mumbai mayor) किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांची प्रकृती उत्तम असून त्यांना आज परळच्या (parel) ग्लोबल रुग्णालयातून (global hospital) डिस्चार्ज देण्यात आला. ग्लोबल रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या निरोपाला उत्तर देताना महापौर म्हणाल्या की, "ग्लोबल रुग्णालय आपल्या नावाप्रमाणे आहे. येथे आलेल्या प्रत्येक रुग्णांची या आरोग्य मंदिरात चांगली सेवा केली जाते. मी सर्व रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानते." छातीत दुखू लागल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Mumbai mayor kishori pednekar got discharge from parel global hospitl dmp82)

स्थानिक आमदार अजय चौधरी, माजी आमदार दगडू दादा सपकाळ, सुधीर साळवी यांचे विशेष सहकार्य लाभले असून याबद्दल महापौरांनी त्यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा: "वेबसीरिज, शॉर्ट स्टोरीजच्या आमिषानं नवोदित अभिनेत्रींची फसवणूक"

त्यासोबतच रुग्णालयाचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. विवेक तळवलीकर, वरिष्ठ ह्दयरोग  तज्ञ डॉ.  प्रवीण कुलकर्णी,  अस्थिरोग तज्ञ  डॉ. श्रीधर आर्चिक, पोटविकार तज्ञ डॉ.  अमित मायदेव, यकृत तज्ञ डॉ. आकाश शुक्ला, ग्लोबल रुग्णालयाचे परिचालन प्रमुख अनुप लॉरेंस,  परिचारिका विभागाच्या प्रमुख जेसिका डिसूझा या सर्वांचे सुद्धा महापौरांनी आभार मानले आहेत.

loading image