esakal | "भाजपने खुशाल आंदोलन करावं, सतरंज्या आम्ही घालून देतो..."

बोलून बातमी शोधा

"भाजपने खुशाल आंदोलन करावं, सतरंज्या आम्ही घालून देतो..."

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकरांचा खोचक टोला

"भाजपने खुशाल आंदोलन करावं, सतरंज्या आम्ही घालून देतो..."
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्यात सध्या कोरोनाचा वेग काहीसा आटोक्यात यायला सुरूवात झाली आहे. राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाउनचा काही अंशी फायदा होत असल्याचं चित्र आहे. मुंबईच्या (Mumbai) रूग्णवाढीच्या दरातही कपात झाल्याचं दिसत असून रूग्ण दुपटीचा कालावधी वाढला आहे. मुंबईच्या दृष्टीने काही दिलासादायक गोष्टी घडत असताना आता १८ ते ४४ या वयोगटातील लोकांना लसीकरण (Vaccination) करणं हे मुंबई पालिकेसाठी एक मोठं आव्हान आहे. मुंबईत या वयोगटातील लोकसंख्या प्रचंड असून त्यांना मोफत लसीकरण करण्यासाठी किती कालावधी लागेल याची कल्पना नाही. अशा परिस्थितीत भाजपच्या नेतेमंडळींना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टोला लगावला. (Mumbai Mayor Kishori Pednekar Taunts BJP Leaders who are warning for Agitation Corona Vaccination)

हेही वाचा: 'माजी मुख्यमंत्र्यांना रात्री दोन वाजता...' काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

"विविध संस्था सध्या मुंबईचं कौतुकं करत आहेत. मुंबईने योग्य उपाययोजना करून राज्यातील लसीकरणाची मोहिम राबवली आणि कोरोना आळा घालण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. कोणतंही संकट आलं, तरी मुंबईकर खंबीर आहेत. हे श्रेय कुण्या एकट्याचं नाही, हे सर्वांचं यश आहे. आणि आम्ही मुंबईकरांची सेवा करण्यासाठी कटीबद्ध आहोत. पण सध्या मोफत लस मिळावी म्हणून भाजपकडून आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती आहे. त्यांना माझा सल्ला आहे की त्यांनी खुशाल आंदोलन करावं कारण लोकशाही आहे. पण त्यांना पहिले केंद्रात याबद्दलचा प्रयत्न करावा आणि मग राज्यात व मुंबईत आंदोलनाला बसावं. आम्ही स्वत: दालनाबाहेर आंदोलन करण्यासाठी त्यांना सतरंज्या घालून देऊ", अशा शब्दात त्यांनी भाजपला टोला लगावला.

हेही वाचा: मुंबई: व्हेंटिलेटर्स रूग्णालयात पडून; डॉक्टर्सना प्रशिक्षणच नाही...

"जे नोंदणीकृत फेरीवाले आहेत. त्यांना आर्थिक मदत नक्की मिळेल. मात्र जे फेरीवाले अधिकृत नाहीत, त्यांच्यासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे पालिकेला काय करता येईल ते नक्कीच पाहू आणि निर्णय घेऊ. नायर रूग्णालयातील काही शिकाऊ डॉक्टर्स सध्या कामबंद आंदोलन करत आहेत. त्याचं एका वर्षापासूनचं स्टासपंड पेंडिंग आहे. मात्र ते काही तांत्रिक कारणांमुळे अडकलं आहे. ते स्टायपंड त्यांना लवकरच मिळेल", असं आश्वासन त्यांनी दिलं.