

Ritu Tawde first speech focuses on water mafia and city reforms
Esakal
महापौरपदावर विराजमान होताच रितू तावडे यांनी मुंबईकरांना दिलासा दिला आहे. पाणीपट्टीत दरवर्षी जूनमध्ये आठ टक्के वाढ करण्याचे अधिकार पालिका प्रशासनाला आहेत. या वाढीला स्थगिती देताना दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही महापौर तावडे यांनी दिली. तसेच पाणीमाफियांची मक्तेदारी मोडीत काढू, मुंबई ट्रॅकरमुक्त करू, असा निर्धारही त्यांनी सभागृहातील पहिल्या भाषणात केला.