

Fadnavis Addresses BMC Polls At Mahayuti Rally
Esakal
मुंबईत वरळी डोम इथं महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते विनोद तावडे, अमित साटम, आशीष शेलार, शिवसेना नेते राहुल शेवाळे या मेळाव्याला उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मेळाव्यात मुंबईतील सामान्य माणूस यापुढे मुंबईबाहेर जाणार नाही. त्यांच्या घराचा प्रश्न आम्ही सोडवतोय आणि प्रवासाचा दुसरा जटील प्रश्नही सोडवत असल्याचं सांगितलं पारदर्शकता आणि प्रामाणिकपणे नव्यानं मुंबई घडवू असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं.