आज मेगाब्लॉक, जाणून घ्या कसं असेल आजचं लोकल ट्रेनचे वेळापत्रक

कुलदिप घायवट
Sunday, 24 January 2021

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल-दुरुस्तीसाठी आज मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.

मुंबई: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल-दुरुस्तीसाठी आज मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. यावेळी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.30 या वेळेत ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांना हार्बर लाइन / मुख्य मार्गाने प्रवास करण्याची परवानगी दिल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

कुठे : माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद 
कधी : सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत
परिणाम : सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळविल्या जातील. सायन आणि मुलुंड दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील आणि आपल्या नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाण्यापुढील जलद लोकल मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.  ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि मुलुंड ते दादर दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. दादरनंतर जलद सेवा परळ येथे अप जलद मार्गावर  वळविण्यात येतील. 

कुठे : ठाणे-वाशी /नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर
कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 दरम्यान

परिणाम : ठाणेहून सुटणाऱ्या वाशी / नेरूळ /पनवेल डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा ब्लॉकवेळी रद्द राहतील.पनवेल / नेरूळ / वाशी येथून ठाणे करीता सुटणारी  ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा ब्लॉकवेळी  रद्द राहतील.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कुठे : सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी 10.35 ते दुपारी 3.35

परिणाम : विलेपार्ले येथील फलाट क्रमांक 5-6 येथे फलाटाची लांबी कमी असल्याने दोनदा थांबा देण्यात येणार आहे. तर, राम मंदिर येथे स्थानकाच्या अभावामुळे लोकल थांबणार नाही. ब्लॉकवेळी काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai mega block january 24 western central trans railway check timetable


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai mega block january 24 western central trans railway check timetable