esakal | मुंबई : महिला डब्यांतून पुरुषांचा प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : महिला डब्यांतून पुरुषांचा प्रवास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील (Railway) लोकल, एक्स्प्रेसमधील महिला डब्यांमध्ये सरसिपणे पुरुषांची, तसेच फेरीवाल्यांची घुसखोरी सुरू आहे. गत दोन वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वेने (Railway) महिला दव्यांमध्ये घुसखोरी करणाऱ्या २९ हजार ५२२ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ७१ लाखांहून अधिक दंड वसुली किली आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून धावणान्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना महिलांचा राखीव डवा जोडलेला असतो; बारा डब्यांच्या लोकलमध्येही तीन डबे महिलांसाठी राखीव असतात. या डब्यांतही पुरुष फेरीवाले विविध वस्तु विक्रीच्या नावाखाली प्रवास करतात. त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर रेलवे पोलिस आणि आरपीएफञ्चार महिला डब्यांमध्ये पकडण्याची कारवाई सुरू आहे.

हेही वाचा: मुंबई : सप्टेंबर मध्ये दिले 29 लाख 51 हजार 157 डोस; विक्रमी लसीकरणाची नोंद

२०१९ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत २९ हजार ५२२ जणांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून ७१ लाखांहून अधिक दंड वसुली केली आहे. लोकलच्या महिला डब्यात पुरुष फेरीवाले बिनधास्तपणे शिरून सामानाची विक्री करतात. त्यामुळे एकटी महिला डब्यात असल्यास भीतीचे वातावरण असते. फेरीवाल्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. काजल पेगडमल, प्रवासी.

loading image
go to top