
Mumbai Metro: लहान मुलांसह मेट्रो ट्रेनमधून प्रवास करत असाल तर सावधान. कारण मुंबईत नुकत्याच घडलेल्या एका घटनेत एक चिमुकला थोडक्यात बचावला. त्याचा हात मेट्रोच्या दरवाज्यात अडकल्यानं मोठी दुर्घटना होता होता टळली. एका मेट्रो कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळं ही दुर्घटना टळली. बांगूर नगर मेट्रो स्थानकात हा प्रकार घडला.