

Passengers stranded at Cuffe Parade metro station as Mumbai Metro Aqua Line services were suspended due to a technical failure.
esaakal
Summary
कफ परेड स्टेशनजवळ तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रो-३ (अक्वा लाईन) सकाळी 10:25 वाजता ठप्प झाली.
पिक अवरमध्ये सेवा बंद पडल्याने कार्यालयीन प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
काही प्रवासी मेट्रोमध्येच अडकून राहिले होते.
Mumbai Metro Breakdown : मुंबईतील भूमिगत मेट्रो-३ मार्गावर कफ परेड स्टेशनजवळ मेट्रो बंद पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. काही तांत्रिक कारणामुळे मेट्रो सेवा ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे. १०: २५ वाजता मेट्रो ठप्प झाली.यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांचे हाल झाले. मेट्रोच्या विलंबामुळे प्रवाशांना मनस्ताप होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.