हुश्श!!! अखेर मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चे कोच मुंबईत दाखल

कुलदिप घायवट
Thursday, 28 January 2021

मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या मार्गावर स्वदेशी बनावटीची चालकरहित मेट्रो कोच मंगळवारी मुंबईत दाखल झाले.

मुंबई:  लाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या मार्गावर स्वदेशी बनावटीची चालकरहित मेट्रो कोच मंगळवारी मुंबईत दाखल झाले.  त्यामुळे 'मुंबई काही मिनिटांत'चे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याचा दावा  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावतीने (एमएमआरडीए) करण्यात येत  आहे.

मेट्रो-2 अ प्रकल्प दहिसर ते डी.एन. नगर आणि मेट्रो-7 प्रकल्प दहिसर पूर्व ते अंधेरी अंधेरी पूर्व मार्गासाठी लागणारी मेट्रो रोलिंग स्टॉक (कोच) अखेर मुंबईत दाखल झाले आहेत, अशी  माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.  

मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 प्रकल्प या मार्गावर चालकरहित मेट्रो बंगळुरू येथील आहे. बंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडकडून (बीईएमएल) स्वदेशी बनावटीच्या मेट्रो आहे. मेट्रो ट्रेन मुंबईत दाखल झाल्यानंतर वेगवेगळ्या आघाड्यांवर चाचणी होईल. त्यानंतर मे पासून प्रवाशांच्या सेवेत मेट्रो दाखल करण्याचे नियोजन आहे. हे काम निर्धारित वेळेत होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रत्येक कोचसाठी सुमारे 8 कोटी रुपये खर्च येत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर या कोचच्या निर्मितीसाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च येतो. त्यामुळे ही कोच निर्मिती आर्थिकदृष्ट्या परदेशी मेट्रोपेक्षा किफायतशीर ठरलेली आहे, असा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा- मुंबई पालिकेच्या लसीकरणाचा पहिला टप्पा 14 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार?

मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या दोन्ही मार्गिकांसाठी 378 कोच टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होणार आहेत. प्रत्येक ट्रेन ही 6 कोचची असणार आहे. या एकूण 63 रेक या मार्गावर मुंबईकरांना सेवा देतील. प्रत्येक कोचमध्ये 52 प्रवाशांची आणि 328 प्रवाशांना उभे राहण्याची व्यवस्था आहे. एका डब्यात सुमारे 380 जणांचा प्रवास शक्य आहे. तर, एका ट्रेनची प्रवासी क्षमता 2 हजार 280 इतकी आहे. या मेट्रो मार्गिकेवरील प्रत्येक ट्रेनची कमाल वेग मर्यादा 80 किमी प्रति तास असेल. चालकरहीत (अन अटेंडेड ट्रेन ऑपरेशन) मेट्रो स्वयंचलित पद्धतीने धावणार आहे. मात्र प्रवाशांना असुरक्षित वाटू नये, यासाठी सुरुवातीला मोटरमनसह या ट्रेन धावणार आहेत, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.

------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai metro corridors 2a and 7 may 2021 coach


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai metro corridors 2a and 7 may 2021 coach