

Mumbai Metro AI System
ESakal
मुंबई : मुंबई मेट्रोने आपली सुरक्षा आणि कार्यक्षमता आणखी मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. पहिल्यांदाच मेट्रो नेटवर्कवर स्वदेशी विकसित आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित व्हील प्रोफाइल मेजरमेंट सिस्टम स्थापित करण्यात आली आहे. ही प्रणाली ट्रेनच्या चाकांना होणारी जीर्णता आणि संभाव्य नुकसान यांचे अचूक मूल्यांकन करेल. वेळेवर दुरुस्ती किंवा बदलण्याची शिफारस करेल.