बंगळुरूमधून निघाली मुंबईची मेट्रो, नक्की प्रकार काय आहे वाचा तर

कुलदीप घायवाट
Friday, 22 January 2021

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांनी मेट्रो-2 A च्या कामांची पाहणी केली.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने (MMRDA ) मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 प्रकल्प सुरू आहेत. या मार्गिकेवर धावणारे मेट्रोचे कोच आज बंगळुरूवरून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. हे कोच येत्या बुधवारी मुंबईतील चारकोप येथील मेट्रो कारशेडमध्ये दाखल होणार असल्याचा विश्वास एमएमआरडीएला आहे. प्रकल्पात कोणताही अडथळा, अडचणी येऊ नये, यासाठी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचे पाहणी दौरे वाढविले आहे.  

महत्त्वाची बातमी : भाजपचा महाविकास आघाडीला खणखणीत टोला, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर भातखळकर कडाडले

बंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडकडून स्वदेशी बनावटीच्या मेट्रो मुंबईत दाखल होणार आहेत. मेट्रो ट्रेन मुंबईत दाखल झाल्यानंतर वेगवेगळ्या आघाड्यांवर चाचणी होईल. त्यानंतर मे पासून प्रवाशांच्या सेवेत मेट्रो दाखल करण्याचे नियोजन आहे. हे काम निर्धारित वेळेत होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे 'मुंबई काही मिनिटांत' स्वप्न लवकर पूर्ण होण्याची वाटचाल सुरू असल्याचा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे.

मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Marathi news from maharashtra

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांनी मेट्रो-2 A च्या कामांची पाहणी केली. मेट्रो चाचण्या सुरक्षित आणि वेळेवर सुरु करण्याच्या दृष्टीने प्राधिकरणाचा प्रत्येक अधिकारी कटिबध्द आहे. त्यामुळे पाहणी दौरे वाढविण्यात आले आहेत, असे MMRDA कडून सांगण्यात आले.

mumbai metro news coaches of mumbai metro left Bangalore

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai metro news coaches of mumbai metro left Bangalore