

Mumbai Metro
ESakal
मुंबई : मुंबईकरांना मोठा दिलासा देत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एमएमआरसी संचालित मेट्रो ३ वरील फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही नवीन व्यवस्था ५ जानेवारीपासून लागू होईल. एमएमआरसीने सोमवार ते शुक्रवार या काळात मेट्रोच्या दैनिक फेऱ्या २६५ वरून २९२ पर्यंत वाढवल्या आहेत, तर शनिवारी एकूण फेऱ्या २०९ वरून २३६ पर्यंत वाढवल्या आहेत.