esakal | मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रोकडून केराची टोपली
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai Metro rejects Cm Uddhav Thackerays order

ख्यमंत्रिपदाची शपथ घेताच उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली; मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) केराची टोपली दाखवण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी झोरू बोथेना यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रोकडून केराची टोपली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली; मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) केराची टोपली दाखवण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी झोरू बोथेना यांनी केला आहे. आरेतील कारशेडचे काम सुरू असल्याची चित्रफीतच झोरू बोथेना यांनी प्रसिद्ध केली असून, ट्विटरवरून त्यांनी ही चित्रफीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांनाही पाठवली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

सत्ता आल्यास आरेतील जंगलाचे रक्षण करू, आरेला जंगल म्हणून घोषित करू, आरेतील वृक्षतोडीस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, अशी आश्वासने शिवसेनेकडून देण्यात आली होती. नवीन सरकारच्या शपथविधीनंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याची घोषणा केली. या घोषणेचे पर्यावरणप्रेमींकडून जोरदार स्वागतही करण्यात आले; मात्र मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला "एमएमआरसी'कडून केराची टोपली दाखवली आहे. कारशेडचे काम सुरू असलेल्या भागात नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

तो दोन्ही पायांनी अपंग; पण, पाहा कशी करतोय चोरी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडचे काम थांबविण्याचे आदेश दिले होते; मात्र तरीही कारशेडचे काम अद्याप सुरू असल्याने "एमएमआरसी' सरकारपेक्षा मोठे आहे का? - झोरू बोथेना, पर्यावरणप्रेमी