esakal | मेट्रो 3 ची कारशेड आरे कॉलनीमध्ये नाहीच ? कारशेड हलवली जाणार पहाडी गोरेगावात ?
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो 3 ची कारशेड आरे कॉलनीमध्ये नाहीच ? कारशेड हलवली जाणार पहाडी गोरेगावात ?

मेट्रो 3 प्रकल्पाचे कारशेड उभारण्यासाठी हजारो झाडांच्या कत्तली करण्यात आल्या आहेत.

मेट्रो 3 ची कारशेड आरे कॉलनीमध्ये नाहीच ? कारशेड हलवली जाणार पहाडी गोरेगावात ?

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 प्रकल्पाचे कारशेड आरेमध्ये उभारण्यास विरोध झाल्यानंतर ते दुसरीकडे हलवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मेट्रो प्रकल्पाबाबत काल (शुक्रवार, दिनांक 28) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मेट्रो अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत आरे कारशेड गोरेगाव येथील पहाटी भागात हलवता येईल काय, याबाबत चर्चा झाल्याचे, समजते.

मेट्रो 3 प्रकल्पाचे कारशेड उभारण्यासाठी हजारो झाडांच्या कत्तली करण्यात आल्या आहेत. त्याला पर्यावरणवादी संघटनांनी तीव्र विरोध केल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी आरेतील मेट्रो कारशेडला कामाला स्थगिती दिली. तसेच पाच सदस्यीय समिती नेमून आरेऐवजी कारशेडसाठी दुसरी जागा निवडण्याचे निर्देश दिले होते.

या समितीपुढे कांजुरमार्ग आणि इतर जागांसोबतच आरेपासून अवघ्या एक किमी अंतरावर असणाऱ्या रॉयल पामच्या जागेचा देखील विचार करण्यात आला होता. याबाबत मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही

या महत्त्वाच्या बातम्याही वाचा : 

-- ५ तासांच्या चौकशीनंतर रियाला देण्यात आला २० मिनिटांचा ब्रेक, CBI ने विचारलेत 'हे' प्रश्न

-- आली लहर, केला कहर! चोराने चोरलं महावितरण कार्यालयातील हजेरीपत्रक, कर्मचाऱ्यांना लागला शॉक

-- ५ तासांच्या चौकशीनंतर रियाला देण्यात आला २० मिनिटांचा ब्रेक, CBI ने विचारलेत 'हे' प्रश्न

( संपादन - सुमित बागुल )

mumbai metro three car shed might be shifted from aarey to pahadi goregaon