esakal | मुंबई: मेट्रो 3 चे डबे सज्ज; एकूण 31 ट्रेनसाठी 248 डब्यांची निर्मिती | Mumbai Metro
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai metro

मुंबई: मेट्रो 3 चे डबे सज्ज; एकूण 31 ट्रेनसाठी 248 डब्यांची निर्मिती

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो भुयारी मार्ग 3 (mumbai metro) च्या डब्यांची (metro निर्मिती (metro bogie) मेक इन इंडिया (make in india) या धोरणाअंतर्गत (policy) होत आहे. अँलस्टाँम कंत्राटद्वारे आंध्रप्रदेश येथील श्री सिटी येथील कारखान्यात काही डबे तयार झाले आहेत. या डब्यांची पाहणी करण्याकरिता, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा (durga shankar mishra) गेले होते. यावेळी त्यांनी कारखान्याच्या परिसरात डब्याची चाचणी (bogie test) घेण्यासाठी 960 मीटर भागात डब्यातून फेरफटका मारला.

हेही वाचा: मुंबईत 95 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण

मेट्रो-3 च्या डब्यांच्या प्रतिकृतीचे अनावरण 2019 साली करण्यात आले होते. तर, आता वास्तवात मेट्रो 3 तयार झाली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (मुं.मे.रे.कॉ) मेट्रो-3 चे डब्बे बनविण्याचे काम अँलस्टाँम ट्रान्स्पोर्ट इंडिया लि. ही कंपनी दिले आहे. मेट्रो 3 साठी 8 डब्यांच्या एकूण 31 ट्रेन बनत आहेत. त्यामुळे 248 डब्यांची निर्मिती येथे होत आहे. या प्रत्येक डब्यांची लांबी ही 180 मीटर आहे. या प्रत्येक डब्यात 300 प्रवाशांची क्षमता आहे. तर पूर्ण 8 डब्यांत 2 हजार 350 प्रवाशांचा प्रवास होऊ शकतो.

मेट्रो 3 च्या डब्याचा रंग हा फिका हिरवा ( अॅक्वा ग्रीन) आणि फिका पिवळा (बेज) या रंगाचा आहे. मेट्रो 3 च्या डब्यात संपूर्ण वातानुकलितसह नियंत्रण, सुरक्षित आरामदायी प्रवास होणार आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी व जाहिराती करिता 'एलसीडी'चा वापर केला जाणार आहे. डिजिटल मार्गिकेचा नकाशा, प्रवाशांसाठी उद्घोषकांचा वापर,बैठक व्यवस्थेसह उभे राहण्यासाठी खांबांची व्यवस्था, दिव्यांग प्रवाशांसाठी व्हील चेयर ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक डब्ब्यात सीसीटीव्हीची सुविधा, आगीपासून सुरक्षेसाठी प्रत्येक डब्ब्यात अग्निशमन, धूर व अग्नी शोधक यंत्रणा, आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी व ट्रेन नियंत्रक यांच्यात संवाद राहण्यासाठी ध्वनी संवाद यंत्रणा बसविण्यात आली आहे.

दरम्यान, मेट्रो 3 भुयारी मार्गावर धावणाऱ्या मेट्रोमधून प्रवास आरामशीर, वेगवान असून मेट्रो 3 मुळे वाहतूक कोंडीचे समस्या, डिझेल, पेट्रोलच्या गाड्यांचा वापर कमी होईल. परिणामी, कार्बनचे उत्सर्जन कमी होईल, असा विश्वास दुर्गा शंकर मिश्रा यांनी समाज माध्यमावरून व्यक्त केला.

loading image
go to top