मेट्रो वनची ​तिकिटे आता मराठीतही; मराठी एकीकरण समितीच्या मागणीला यश

   Metro one Marathi ticket
Metro one Marathi ticketsakal media
Updated on

मुंबई : घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मार्गावर धावणाऱ्या मेट्रो वनचे (Metro one) तिकिटे फक्त इंग्रजीतून प्रवाशांना मिळत होते. मुंबई मेट्रो वनचे तिकिटे मराठीतून (Ticket in Marathi) मिळण्याबाबत मराठी एकीकरण समितीच्यावतीने मागणी करण्यात येत होती. मुंबईमधील मेट्रोमध्ये (Mumbai metro) प्राधान्याने मराठीतून तिकिटे देण्याची मागणी जोर देत होती. त्यानंतर तब्बल एक वर्षांच्या कालावधीनंतर मेट्रो प्रशासनाने (Metro Authorities) मराठीमधील छापील तिकिट विक्री करण्यास सुरूवात केली आहे.

   Metro one Marathi ticket
गोदरेज अॅग्रोव्हेटचे उत्पन्न वाढले

मागील सात वर्षापासून घाटकोपर ते वर्सोवा दोन्ही दिशेकडे मेट्रो वन उन्नत मार्गाने धावत आहे. या सेवेला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडण्याचे काम मेट्रोमुळे झाले आहे. मात्र, या मेट्रोचे तिकिट फक्त इंग्रजीमधून मिळत होते. यासंदर्भात मराठी एकीकरण समितीच्यावतीने नोव्हेंबर 2020 मध्ये मराठीतून देण्याची मागणी केली. मात्र, त्यानंतरही मराठीतून तिकिटे उपलब्ध झाली नाही. याबाबत मराठी एकीकरण समितीचे वसई पदाधिकारी जॉय फरगोज यांनी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारणांर्गत मुंबईत घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवा दिली जाते. मात्र, त्याची तिकिटे इंग्रजी भाषेत प्रवाशांना दिली जात आहेत. महाराष्ट्र राजभाषा कायद्यानुसार मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक असताना मेट्रो प्रशासनाकडून मराठीला डावले जात आहे. परिणामी, मराठी भाषेचा अपमान होत आहे. त्यामुळे मेट्रोला मराठीत तिकिटे छापण्याचे आदेश द्यावेत, अशी तक्रार फरगोज यांनी केली. त्यानंतर तत्काळ एमएमआरडीएच्या आयुक्तांना महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून मेट्रो तिकिटे मराठीत छापण्याचे आदेश दिले. परिणामी, आता मेट्रो वनची तिकीट प्रवाशांना इंग्रजीसह मराठीत मिळत आहेत.

मेट्रो वनची मराठीमधील तिकिटे सध्या सर्व स्थानकावर उपलब्ध नाहीत. सध्या मराठीमधील तिकिटे मेट्रो स्थानकाच्या काही स्थानकावर उपलब्ध केली आहेत. टप्प्याटप्यानुसार मराठीमधील तिकिटांची सुविधा पुरविली जात आहे. घाटकोपर ते वर्सोवा या दरम्यानच्या स्थानकावर उलटसुलट पध्दतीने मराठीमधील तिकिटे दिली जात आहेत. प्रायोगिक तत्वावर हे काम सुरू असून लवकरच सर्व स्थानकावर मराठीमध्ये तिकिटे उपलब्ध होतील. येत्या काळात इंग्रजी आणि मराठीत तिकिटे उपलब्ध असतील, अशी माहिती मेट्रो प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com