मुंबई मेट्रो लावणार 21000 झाडे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

मुंबई - मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे वृक्षतोडीची भरपाई तसेच सीएसआर योजनेतून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुमारे 20 हजार 900 झाडे लावण्यात येणार आहेत. पुढील सात वर्षे त्या झाडांची देखभालही केली जाईल. मुंबई मेट्रो आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्यात झालेल्या करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 

वृक्ष प्राधिकरण समितीच्या संमतीनुसार उद्यानाच्या हद्दीतील मालाड, आकुर्ली येथे 19 हेक्‍टर जागा झाडे लावण्यासाठी दिली जाणार आहे. 20 हजार 900 झाडांपैकी 10 हजार 450 झाडे ही भरपाई म्हणून; तर उर्वरित झाडे सीएसआर योजनेतून लावली जातील. त्यामध्ये बेल, चाफा, जंगली बदाम, साग, सप्तरंगी, सिंगापूर चेरी ही झाडे लावली जातील. 

मेट्रोसाठी तोडलेल्या प्रत्येक झाडामागे तीन झाडे लावणे बंधनकारक होते; मात्र त्यापेक्षा जास्त झाडे मुंबई मेट्रोकडून तज्ज्ञांच्या देखरेखीखाली लावली जातील. 
- अश्‍विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो. 

Web Title: Mumbai Metro will plant 21000 trees