

MHADA Mumbai House Lottery
ESakal
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सामान्य नागरिकांना महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) एक मोठी भेट देत आहे. म्हाडाचे मुंबई बोर्ड आगामी लॉटरीची तयारी करत आहे. ज्यामध्ये अंदाजे ५,००० परवडणाऱ्या घरांचा समावेश असेल. या लॉटरीची अधिकृत घोषणा मार्च किंवा एप्रिल २०२६ मध्ये होऊ शकते.