
Mumbai: मुंबईतील घरांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर म्हाडा आता बांधकामाधीन असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांतील सुमारे तीन-चार हजार घरांची लॉटरी काढणार आहे.
त्यानुसार पुढील वर्ष-दीड वर्षात कोणते प्रकल्प पूर्ण होऊ शकतात त्याचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे घर खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. बांधकाम सुरू असतानाच लॉटरी काढून पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याने विजेत्यांना टप्प्याटप्प्याने घरांचे पैसे भरता येणार आहेत.
मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील घरांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे मुंबईत हक्काचे घर मिळावे, यासाठी प्रत्येकाचे म्हाडाच्या लॉटरीकडे लक्ष असते. म्हाडाच्या मुंबई मंडळाने २०२४ मध्ये २०२० घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरीला तब्बल एक लाख १३ हजार अर्ज आले होते, म्हणजे एका घरासाठी ५५ अर्ज एवढी स्पर्धा होती.