मुंबईत मिलन सबवेजवळ कारला अपघात;4 ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

मुंबई - मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस मार्गावर मिलन सबवे जवळ भरधाव वेगाने जाणारी होंडासिटी कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर, एक जण जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (गुरुवार) पहाटे हा अपघात झाला असून, कारमधील पाच जणांपैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला. कारचे पासिंग हे पुण्यातील (एमएच 12 सीआर 2815) असल्याने मृत नागरिक हे पुण्यातील असण्याची शक्यता आहे.

पश्चिम एक्स्प्रेस मार्गावरून रामनगर येथे भरधाव वेगाने जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती झाडावर आदळली. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Mumbai Milan subway near the car accident killed 4