Mumbai Milk : दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी मोठी मजल आवश्यक; गोदरेज जर्सीच्या भूपेंद्र सुरी यांचे मत

पाश्चिमात्य देशांमध्ये अत्यंत व्यावसायिक आणि आधुनिक पद्धतीचे चार-पाच हजार गुरांचे गोठे असल्याने त्यांची उत्पादकताही मोठी असते. आपणही त्याच्या जवळपास गेलो तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना तसेच दुग्धजन्य पदार्थ उत्पादक कंपन्यांना होईल.
mumbai Milk
mumbai Milkesakal

मुंबई - पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतातील गाई-म्हशींचे दूध उत्पादन वाढावे यासाठी सर्वच दृष्टीने प्रयत्न आवश्यक असून त्यात आपल्याला फार मोठी मजल मारायची आहे, असे मत गोदरेज जर्सी चे व्यवस्थापकीय संचालक भूपेंद्र सुरी यांनी सकाळ कडे व्यक्त केले.

mumbai Milk
Mumbai Crime : स्वछतागृहाच्या तारा उचकटून त्याने तेथून पळ काढला,कल्याण लोहमार्ग पोलिसांनी पाठलाग करत केली अटक

पाश्चिमात्य देशांमध्ये अत्यंत व्यावसायिक आणि आधुनिक पद्धतीचे चार-पाच हजार गुरांचे गोठे असल्याने त्यांची उत्पादकताही मोठी असते. आपणही त्याच्या जवळपास गेलो तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना तसेच दुग्धजन्य पदार्थ उत्पादक कंपन्यांना होईल. त्यासाठी गोदरेज जर्सी तर्फेही दूध उत्पादक शेतकऱ्यांना गुरांची काळजी घेणे,

mumbai Milk
Pune : परिश्रमाने बारामतीच्या ओमने मिळविले दहावीत 95 टक्के गुण...

त्यांची उत्पादकता वाढवणे, त्यासाठी चांगला पशु आहार वापरणे आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. आपणही एकंदर सर्वच बाबतीत काळजी घेतली तर आपलेही उत्पादन वाढू शकते, अशीही खात्री त्यांनी व्यक्त केली.

mumbai Milk
Mumbai : मार्च महिन्यानंतर पुन्हा एकदा रविवारी दुपारी ठाणे जिल्ह्यातील काही भागात आले धुळीचे वादळ

दूध उत्पादन वाढवण्यासाठी सीएसआर योजनेतूनही शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, त्यांच्यासाठी पशुधन शिबिरे आयोजित करणे, पशुवैद्यकांची नियुक्ती करून शेतकऱ्यांना सहाय्य करणे आदी उपाय केले जातात असेही ते म्हणाले. गोदरेजच्याच मॅक्सिमिल्क तर्फे नाशिकला आधुनिक गोठ्यात गुरांचे दुधाचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थात यासाठी शेतकऱ्यांना खूप शिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला सर्वच पातळीवर मोठी मजल मारावी लागेल असेही सुरी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com