esakal | मुंबई: गिरणी कामगारांना मिळेना घराचा ताबा
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई: गिरणी कामगारांना मिळेना घराचा ताबा

मुंबई: गिरणी कामगारांना मिळेना घराचा ताबा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: पनवेल कोन येथील सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या विजेत्यांना अद्यापही ताबा न मिळाल्याने गिरणी कामगार संघटना आक्रमक झाली आहे. विजेत्यांनी घराचे पैसे भरल्यानंतरही कामगार आणि वारसांना ताबा देण्यात येत नसल्याने विजेते म्हाडा कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी गिरणी कामगार संघटनांची बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कामगारांच्या प्रश्नांवर आंदोलनाची भूमिका जाहीर करण्यात येणार आहे.

हेही वाचा: दोन महिन्यांतील कोविड मृत्यूंचा अभ्यास होणार

एमएमआरडीएने पनवेल कोन येथील भाडेतत्वावरील योजनेसाठी उभारलेली घरे गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर म्हाडामार्फत 2016 मध्ये 2 हजार 417 घरांची सोडत काढण्यात आली. सोडतीनंतर म्हाडाकडून विजेत्यांना देकारपत्र देण्यात आले. त्यानुसार सुमारे 600 कामगारांनी पात्रता झाल्यानंतर घराची संपूर्ण रक्कम भरली आहे. मात्र घराचा ताबा म्हाडा देणार की एमएमआरडीए देणार यावरून वाद सुरु होता. काही महिन्यांपूर्वी मुख्य सचिवांकडे झालेल्या बैठकीत म्हाडाने विजेत्या कामगारांना ताबा देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

एमएमआरडीएची ही घरे कोरोना सेंटर म्हणून अद्यापही महापालिकेच्या ताब्यात आहेत. ही घरे एमएमआरडीएने ताब्यात न घेतल्याने अजूनही म्हाडामार्फत विजेत्यांना घराचा ताबा देण्यात आलेला नाही. एमएमआरडीएने घरांचा ताबा दिल्यास त्यांचे वितरण करण्यात येणार असल्याचे म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गिरणी कामगारांना सोडतीनंतरही घरे मिळत नसल्याने कामगारांमध्ये नाराजी आहे.

हेही वाचा: ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली, बारवी धरण 92 टक्के

यासह कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून त्याविषयी भूमिका ठरविण्यासाठी शनिवारी (ता.4) श्रमिक संघटनेच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत गिरणी कामगारांच्या प्रशांबाबत आंदोलनाची भूमिका जाहीर करण्यात येईल, असे श्रमिक संघटनेच्या गिरणी कामगार विभागाचे अध्यक्ष बी. के.आंब्रे यांनी सांगितले.

loading image
go to top