esakal | ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली, बारवी धरण 92 टक्के
sakal

बोलून बातमी शोधा

barvi dam

ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली, बारवी धरण 92 टक्के

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरण परिसरात गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस होत आहे. पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, 92.58 टक्के धरण भरले आहे. धरण परिसरात आत्तापर्यंत 1947 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात बारवी धरण भरण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र पावसाने दिलेल्या उघडीपमुळे धरण भरण्यास उशीर झाला आहे. 92 टक्के धरण भरल्याने पाणी टंचाईची समस्या उदभवणार नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: बदलापूरात सहाय्यक आयुक्तांवरील हल्ल्याचा निषेध

बारवी धरणातून ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी महापालिकांना, औद्योगिक विभागास पाणी पुरवठा केला जातो. पाऊस चांगला झाल्यास बारवी धरण साधारण ऑगस्ट महिन्यात पूर्ण क्षमतेने भरते. जुलै महिन्यात शेवटी पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर ऑगस्ट महिन्यात धरण भरण्याची शक्यता वर्तविली जात होती.

मात्र पावसाने ओढ देत सर्वच शक्यतांवर पाणी फेरले. गेल्या दोन तीन दिवसांपासून धरण परिसरात पावसास चांगली सुरवात झाली असून धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या दिवशी धरणातील पाण्याची पातळी 71.84 मी असून 92.58 टक्के धरण भरले आहे.

2019 साली 4 ऑगस्टला तर 2020 साली 31 ऑगस्टला धरण पूर्ण क्षमतेने भरले. यंदा सप्टेंबर महिना उजाडला असून अद्यापही धरण 92 टक्केच भरले आहे. महिनाभराच्या उघडीपनंतर पुन्हा दोन दिवसांपासून पावसाला सुरवात झाल्याने धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. 92 टक्के धरण भरल्याने पुढील वर्षाची पाणी टंचाईची समस्या सुटल्याचे सूत्रांनी सांगितले.

loading image
go to top