Bala Nandgaonkar and Uddhav Thackeray address protesting mill workers at Azad Maidan : मुंबईत घर मिळावे, या मागणीसाठी गिरणी कामगारांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी गिरणी कामगारांच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. तसेच सरकारवर जोरदार टीकाही केली.