
Incredible rescue by Mumbai Police! Missing sisters reunited with their family after 48-hour search operation.
esakal
मुंबईत एक धक्कादायक घटना घडली. एकाच कुटुंबातील दोन मुली मुंबईत हरवल्या, आणि त्यामुळे त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. आई-वडिलांना एवढ्या मोठ्या शहरात मुली कुठे शोधायच्या, हे काहीच समजत नव्हतं. तरीही त्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू ठेवली आणि अखेर मुंबई पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी हरवलेल्या या अल्पवयीन मुलींचा अवघ्या ४८ तासांत शोध घेतला. मुली सापडल्यावर कुटुंबाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.