
डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकात एक महिला भिक मागण्यासाठी मुलीचा वापर करत होती. एका जागरुक महिलेने याविषयी लता अरगडे यांना ही बाब लक्षात आणून दिली. त्यांनी याविषयी आरपीएफला कळविले परंतू तोपर्यंत ती महिला मुलीला घेऊन पळून गेली. लता अरगडे यांनी तत्काळ आमदार राजू पाटील यांना ही घटना सांगितली.
आमदारांनी याविषयी ट्विट करत मुलीचा शोध घेण्याची सूचना करताच आरपीएफ कामाला लागले आणि अवघ्या काही तासाच महिलेचा शोध घेत सात वर्षीय मुलीची तिच्या तावडीतून सुटका केली आहे. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात निल्या काळे व नाशिका काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुले पळवणारी टोळी शहरात फिरत असल्याच्या व्हायरल संदेशामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असताना डोंबिवली रेल्वे स्थानकात एक महिला भिक मागण्यासाठी एका मुलीचा वापर करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी रात्री माया कोठावदे व सायली शिंदे या प्रवासी महिला रेल्वे स्थानकातून प्रवास करत असताना एका भिक्षेकरी महिलेच्या समोर एक मुलगी झोपलेली तिने पाहिले.
भिक मागण्यासाठी या मुलीचा वापर केला जात होता. परंतू ती मुलगी तिची नसावी असा संशय आल्याने त्या महिलेने तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी लता अरगडे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यांनी लागोलाग याची माहिती आरपीएफ, जीआरपी यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता तेथे ती महिला व मुलगी आढळून आली नाही. परंतू ती महिला याच परिसरात असावी व त्या मुलीची त्यांच्या तावडीतून सुटका व्हावी यासाठी लता यांनी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांना ही बाब सांगितली.
त्यांनी लागोलाग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे पोलीस, आरपीएफ यांना ट्विट करत या घटनेत लक्ष घालण्याची मागणी केली. आमदार यांचे ट्विट पडताच डोंबिवली आरपीएफचे पोलीस निरिक्षक यशोदा यादव, पोलीस उपनिरिक्षक सुहास मनोहर आणि रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मुकेश ढगे यांनी रेल्वे स्टेशन परिसरात त्यांचा शोध सुरु केला. तसेच मनसेचे पदाधिकारी संदिप म्हात्रे व प्रेम पाटील यांनी देखील या परिसरात महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली.
कल्याण दिशेच्या ब्रीजवर हि महिला यांना आढळून आल्याने त्यांनी त्या महिलेला मुलीला व तिच्या नवऱ्याला आरपीएफच्या ताब्यात दिले. निल्या काळे (वय 82) व नाशिका काळे (वय 72) हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील बिटकेवाडी येथील असून ते डोंबिवली रेल्वे स्थानकात भिक मागून आपली गुजरान करतात.
त्यांच्या जवळ सापडलेली सात वर्षीय मुलगी आशिना भोसले हि त्यांची नात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे, तसेच मुलीचा नंबर देखील दिला आहे, परंतू तो नंबर लागत नसल्याने पोलिस उपनिरिक्षक सुहास मनोहर यांनी सांगितले.सध्या त्या मुलीची चाईल्ड केअर मध्ये रवानगी केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.