esakal | मुंबई-ठाण्याला पावसाने झोडपले; वादळी वाऱ्यांसह मुसळधारेचा इशारा | Heavy Rainfall
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rainfall

मुंबई-ठाण्याला पावसाने झोडपले; वादळी वाऱ्यांसह मुसळधारेचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईला (Mumbai-thane) आज सायंकाळी जोरदार पावसाने झोडपून (heavy rainfall) काढले. मुसळधार पावसाने ट्रान्स हार्बर आणि मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळित (railway problem) झाली होती. दिवसभर उन्हाचे चटके बसत असताना वातावरणात बदल झाला असून येणाऱ्या काही तासांत मुंबईसह आसपासच्या परिसरात पावसाचा अंदाज (Rainfall alert) व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली असून घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

हेही वाचा: कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस

बुधवारी संध्याकाळी ५.३० ते ७ च्या दरम्यान ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत १०-१२ कि.मी. उंचीचे ढग दाटून आले. त्यामुळे आसमंतात गडगडाटासह व विजांसह पाऊस पडला. मुंबईमध्येही त्याचा प्रभाव जाणवला. पुढेही जोर जाणवण्याची शक्यता आहे. आठवडाभरापासून मुंबईतील उष्मा वाढला आहे. मंगळवारी रात्री पाऊस पडल्यानंतरही बुधवारी किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसले. सांताक्रूझ ३५.१ आणि कुलाब्यात ३३.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाची काहिली वाढली आहे.

परिणामी, उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. कालपासून रात्री पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. संध्याकाळनंतर पावसाने हजेरी लावली. मुंबईच्या उपनगरांत पावसाने जोर धरला असला तरी उकाडा कमी झालेला नाही. मुंबई हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासोबत काही ठिकाणी ३० ते ४० कि.मी. प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. ... या भागात पावसाचा इशारा मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, पुणे, नगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली.

रेल्वे सेवा विस्कळित जोरदार पावसामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली ते ठाणे स्थानकांच्या दरम्यान बुधवारी सायंकाळी ६.२० च्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल सेवा विस्कळित झाली. दुरुस्ती कामात मुसळधार पावसामुळे अडथळे निर्माण झाले होते. रात्री ८ वाजेपर्यंत रेल्वे वाहतूक सुरळीत झालेली नव्हती. त्यामुळे प्रवाशांच्या हालात भर पडली. लोकलमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांनी खाली उड्या मारून ठाणे-बेलापूर मार्गाने घर गाठले. पावसामुळे मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा आणि कर्जत मार्गावरील उपनगरी रेल्वे वाहतूकही ओव्हरहेड वायरमधील बिघाडामुळे ठप्प झाली होती. रेल्वेकडून तांत्रिक बिघाडाचे कारण देण्यात आले. दोन्ही दिशांकडील वाहतूक संथगतीने सुरू होती. काही ठिकाणी गाड्या जागीच थांबल्या होत्या.

loading image
go to top