Mumbai : एमएसआरडीसी पावसाळी नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार mumbai MSRDC monsoon control room will be functioning 24 hours | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSRDC

Mumbai : एमएसआरडीसी पावसाळी नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार

मुंबई - मुंबई महानगर प्रदेशातील पावसामुळे उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने 1 जून पासून पावसाळी नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहे. सदर नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार असून महामंडळाचे अधिकारी व अभियंता कर्तव्य बजावणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेशातील महामंडळाच्या अखत्यारितील विविध उड्डाणपुलांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी अभियांत्रिकी विभागाकडे आहे. राज्य (मंत्रालय) व बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या बरोबर एम एम आर डी ए च्या नियंत्रण कक्षाच्या समन्वय राहणार असून, नियंत्रण कक्ष 30 सप्टेंबर, पर्यंत सुरु राहणार आहे.

टॅग्स :MumbaiMonsoonMSRDC