MTHL Project : एमटीएचएल प्रकल्प महाराष्ट्राला आर्थिक गती देईल - हिरोशी सुझुकी

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मुळे नक्कीच नवीन नवी मुंबई (तिसरी मुंबई) निर्माण होईल, अशी आशा जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी व्यक्त केली.
hiroshi suzuki
hiroshi suzukisakal

मुंबई - मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मुळे नक्कीच नवीन नवी मुंबई (तिसरी मुंबई) निर्माण होईल, अशी आशा जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी भारत सरकार राज्य सरकार आणि एमएमआरडीएचे अभिनंदन ही केले.

जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी सहकाऱ्यांसह मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा गुरुवार (ता.७) रोजी पाहणी दौरा केला. अभियांत्रिकी आविष्कार असलेल्या या प्रकल्पाच्या उभारणीसाठी एमएमआरडीएच्या योगदानाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

ते म्हणाले, 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील विकासासाठी ऐतिहासिक प्रकल्प आहे. यामुळे केवळ प्रवासाचा वेळ कमी होणार नाही तर हा प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडला गेल्याने खरोखरच खूप मोठे सकारात्मक परिणाम होणार आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या उल्लेखनीय आर्थिक प्रगतीला गती देणार आहे. तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मुळे नक्कीच नवीन नवी मुंबई (तिसरी मुंबई) निर्माण होईल. मुंबई आणि एमएमआरच्या विस्ताराला नवा आयाम देण्यासाठी मी भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि एमएमआरडीएचे अभिनंदन करतो.'

hiroshi suzuki
Electricity : मुंबईकरांची महावितरणकडून १३४० दशलक्ष युनिट इतकी अतिरिक्त वीजखरेदी

यावेळी राजदूत सुझुकी यांच्या पत्नी सुश्री इको सुझुकी, मंत्री सुश्री क्योको होकुगो, सचिव कोइची उसामी, सुश्री मयू होम्मा, जपानच्या मुंबईसाठी महावाणिज्य दूतावासाकडून महा वाणिज्यदूत डॉ. यासुकाता फुकाहोरी, अतिरिक्त चान्सलर युझुरु इशी आणि जायकाचे प्रतिनिधी प्रकल्पाच्या पाहणीदौऱ्यात सहभागी झाले होते.

एमटीएचएल प्रकल्पांतर्गत मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान सागरावर पूल बांधून मुंबईला पूर्वेकडील मुख्य भूभागाशी जोडून एक नवीन वाहतूक पायाभूत सुविधा प्रदान करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com