
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी दिलेली अनपेक्षित भेट चर्चेचा विषय ठरली आहे. ही भेट पाऊण तास चालली. याबाबत वेगवेगळे तर्क काढले जात आहे.