

BEST Bus
ESakal
मुंबई : आर्थिक गर्तेत सापडलेल्या 'बेस्ट'ला उभारी देण्यासाठी मुंबई महापालिकेने मंगळवारी एक हजार कोटींच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव मंजूर केला. या ऐतिहासिक निर्णयामुळे बेस्टच्या हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी (उपदान) आणि विद्यमान कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. तसेच डिसेंबरअखेरपर्यंत बेस्टच्या ताफ्यात २७५ अत्याधुनिक इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत.