
Mumbai environmental update
esakal
मुंबई : हिवाळ्यात प्रदूषणाचा धोका वाढतो, याची दखल घेऊन मुंबई महापालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ‘डस्ट कंट्रोल’ अर्थात धूळ नियंत्रण नियमावली अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील हालचाली सुरू असून नियमावली हिवाळा सुरू होण्याआधीच लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.