
Water connections provided by Municipality
ESakal
मुंबई : मुंबईतील रे रोड परिसरातील पारधी वाडा येथील सुमारे ३० कुटुंबियांच्या तीन दशकांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे. या रहिवाशांना हक्काचे आणि कायदेशीर पाणी मिळू लागले आहे. मुंबई महापालिकेच्या ‘सर्वांसाठी पाणी’ या धोरणाअंतर्गत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर वास्तव्य करणाऱ्या या कुटुंबांना मुंबई महापालिकेकडून अधिकृत जलजोडणी देण्यात आली आहे.