
सकाळ वृत्तसेवा, मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून मुंबईच्या पाणी पट्टीत वाढ केली नसून मुंबई महापालिकेचे आर्थिक समीकरण जुळवण्यासाठी २०२५ मध्ये पाणी पट्टीत ८ टक्के वाढ करण्याचा निर्णयावर चर्चा सुरु आहे. पाणी पट्टीत वाढ करण्याबाबत चर्चा सुरु असून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, असे पालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी सांगितले. विरोधी पक्षांनी पाणी दरवाढीला विरोध केला असून आगामी पालिका निवडणूकीमुळे पाणी दरवाढीचा निर्णय रद्द होण्याची शक्यता आहे.