दरम्यानच्या काळात अनेकदा निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळाले. राजकीय पक्ष कामालाही लागले, मात्र निवडणुकांनी प्रत्येक वेळी हुलकावणी दिली.
Mumbai Election News: मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचा (Mumbai Municipal Corporation Elections) मुहूर्त गेल्या दोन वर्षांपासून चुकतोय. निवडणुका घेण्याच्या कोणत्याही हालचाली होत नसल्याने आता एप्रिल महिन्यातील मुहूर्तदेखील हुकणार असल्याचे दिसते. राजकीय पक्ष यामुळे संभ्रमात पडले असून, निवडणुकांच्या कामाला नेमकं लागायचं कधी, असा प्रश्न त्यांना पडला आहे. सर्वच राजकीय पक्ष सध्या गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.