
मुंबई : जलविद्युत, सौरऊर्जा आणि कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचे प्रकल्प उभारून मुंबई महापालिका विद्युत निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. मध्य वैतरणा धरण आणि देवनार डम्पिंग ग्राउंड येथे विद्युतनिर्मितीचे प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत.