

BMC
Esakal
मुंबई : मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता (एक्यूआय) अचूकपणे मोजण्यासाठी आणि प्रदूषणावर मात करण्यासाठी महापालिकेने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. महापालिकेने 'मानस' प्रकल्पांतर्गत आयआयटी कानपूर आणि आयआयटीएम पुणे या संस्थांच्या सहकायनि 'एअरवाईज' ही अत्याधुनिक हवा गुणवत्ता अंदाज प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून शहरात तब्बल ७५ ठिकाणी 'हायपरलोकल सेन्सर्स' बसवले जाणार आहेत.