#VoteTrendLive शिवसेनेला मराठी, भाजपला अमराठींची साथ!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

मुंबई - महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईची मराठी व अमराठी, अशी राजकीय विभागणी झाली आहे. भाजपने काही प्रमाणात मराठी विभागांत जागा मिळवल्या असल्या तरी त्यांना सर्वात मोठा फायदा गुजराती व हिंदी भाषिक मतदारांचा झाला आहे. पश्‍चिम उपनगरांतील अमराठी मतांचा भाजपला सर्वाधिक फायदा झाला; तर शिवसेनेला मराठी मतदारांनी यश मिळवून दिले आहे.

शिवसेनेचा प्रमुख मतदार हा मराठीच होता. या मतांच्या जोरावरच शिवसेनेने मुंबईतील सत्ता टिकवली होती. यावेळी गोरेगाव, मुलुंड, काही प्रमाणात जोगेश्‍वरी येथील मराठी मतदारांनी शिवसेनेला साथ दिली नसली, तरी संपूर्ण मुंबईत मराठी भागातून शिवसेनेचेच उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना ही मराठी मतांच्या जोरावर अव्वल ठरली आहे. फक्त बेहरामपाड्यात शिवसेनेची मुस्लिम नगरसेविका निवडून आली आहे.

शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मराठी मतदारांचा पाठिंबा मिळालेला असताना भाजपला अमराठी मतदारांनी एकगठ्ठा मतदान केले. कॉंग्रेसला काही प्रमाणात अमराठी मतदारांचा पाठिंबा मिळालेला असला तरी तो अत्यंत तुरळक आहे. त्यामुळे या अमराठी मतदारांनी भाजपलाच पाठिंबा दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेला मराठी, तर भाजपला काही प्रमाणात मराठीसह इतर भाषिकांची साथ मिळाली.

कॉंग्रेसला फटका
मुस्लिम मतदारांची मते कॉंग्रेस, समाजवादी पक्ष व एमआयएममध्ये विभागली गेली. यात कॉंग्रेसलाच सर्वात मोठा फटका बसला आहे. गेल्या वेळीपेक्षा सपची एक जागा कमी आहे. त्यामुळे उत्तर भारतीय मतदारांबरोबरच मुस्लिम मतदारांनीही कॉंग्रेसची साथ सोडली असल्याचे दिसत आहे.

Web Title: mumbai municipal election result