

Muktabai Hospital
ESakal
मुंबई : मुंबई महापालिकेच्या घाटकोपर येथील मुक्ताबाई रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. तीव्र रक्तक्षय झालेल्या आणि तातडीने रक्ताची गरज असलेल्या रुग्णाला 'बेड उपलब्ध नाही' या कारणावरून दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे. मुक्ताबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित कवठेकर यांनी हे आरोप फेटाळले आहेत.